"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 26. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★संविधान दिन
★हा या वर्षातील ३३० वा (लीप वर्षातील ३३१ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
●१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : अर्जुन रामपाल – अभिनेता
◆१९५४ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
◆१९३९ : टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
◆१९२३ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक
◆१९२१ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ - नडियाद, गुजराथ)
◆१८९० : सुनीतिकुमार चटर्जी –आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ,
◆१८८५ : देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
●२००१ : चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते.
●१९९४ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी
●१९८५ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)

No comments:

Post a Comment