"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★26.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय महिला आरोग्य दिन
★हा या वर्षातील ५७ वा दिवस आहे.
★कुवेतचा मुक्तीदिन

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड
●१९९९ : आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील ’अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.
●१९९५ : बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
●१९८४ : ‘इन्सॅट-१-इ‘ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित
●१९७६ : वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
◆१८७४ : सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ’कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी, त्यांचा ’कलापिनो केकारव’ हा काव्यसंग्रह खूप गाजला आहे.
◆१८६६ : हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती
◆१६३० : गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (मृत्यू: ६ आक्टोबर १६६१)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट., पद्मविभूषण.
●२००४ : शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (जन्म: १४ जुलै १९२०)
●२००३ : राम वाईरकर – व्यंगचित्रकार, महाराष्ट्रातल्या बालवाचकांना सुपरिचित असलेला फास्टर फेणे वाईरकर यांच्या कुंचल्यातून उतरला होता.
●१९६६ : महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर* यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन ( जन्म: २८ मे १८८३)
●१९३७ : एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ
●१८७७ : मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. 

No comments:

Post a Comment