"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 26. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ ग्राहक दिन
★ हा या वर्षातील ३६० वा (लीप वर्षातील ३६१ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००४ : ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली. या लाटेने भारत आणि शेजारच्या अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.
●१९९७ : विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
●१९७६ : कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
●१८९८ : मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४८ : डॉ. प्रकाश आमटे
◆१९४१ : लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
◆१९३५ : डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका
◆१९२५ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
◆१९१७ : डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.
◆१९१४ : डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)
◆१९१४ : डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या.
◆१७९१ : चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते
●२००० : प्रा. शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक
●१९९९ : शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
●१९८९ : केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६),
●१५३० : बाबर –पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातीलमुघल सत्तेचा संस्थापक 

No comments:

Post a Comment