"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 27. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३६१ वा (लीप वर्षातील ३६२ वा) दिवस आहे.

                   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७५ : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
●१९४९ : इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९११ : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
◆१८९८ : डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
◆१८२२ : लुई पाश्चर –फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
◆१७९७ : मिर्झा गालिब – उर्दू शायर
◆१५७१ : योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या
●१९७२ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते
●१९२३ : गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता 

No comments:

Post a Comment