"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 27. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २०८ वा (लीप वर्षातील २०९ वा) दिवस आहे.

                 ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●२००१ : सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय
●१९९९ : द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.
●१९२१ : रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : अ‍ॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९११ : डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)
◆१६६७ : योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : कृष्णकांत – भारताचे १० वेउपराष्ट्रपती
●१९९७ : बळवंत लक्ष्मण वष्ट –हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते
●१९९२ : अमजद खान – हिन्दी चत्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
●१९८७ : *डॉ. सलीम अली* –
 जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)
●१९७५ : त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.
●१८९५ : उस्ताद बंदे अली खाँ – बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक,  मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. 

No comments:

Post a Comment