"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★28.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय विज्ञान दिन
★हा या वर्षातील ५९ वा दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३५ : वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
●१९२८ : डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो.
●१९२२ : इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४८ : विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका
◆१९४४ : रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार
◆१९२७ : कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२)
◆१९०१ : लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते
◆१८९७ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
◆१८७३ : सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले.

                        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी – औध संस्थानचे राजे
●१९९८ : राजा गोसावी – अभिनेता
●१९८६ : स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या
●१९६६ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.
●१९६३ : डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती(जन्म: ३ डिसेंबर १८८४)
●१९३६ : कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (जन्म: १ ऑगस्ट १८९९)
●१९२६ : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. 

No comments:

Post a Comment