"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 29. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८० वा (लीप वर्षातील १८१ वा) दिवस आहे.

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर
●२००१ : पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर
●१९९५ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.
●१८७१ : ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा
◆१९३४ : कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक
◆१९०८ : प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज
◆१८९३ : प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक
◆१८७१ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू: १ जून १९३४)

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
●२००० : कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार
●१९९३ : विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते
●१९९२ : शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते
●१८९५ : थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक 

No comments:

Post a Comment