"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 29. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
★हा या वर्षातील २१० वा (लीप वर्षातील २११ वा) दिवस आहे.

                  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
●१९८७ : भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
●१९८५ : मल्याळम लेखक टी. एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार
●१९५७ : ’इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.
●१९४८ : दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९४६ : टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.
●१९२० : जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.
●१८७६ : फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१ : फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश रेस कार ड्रायव्हर
◆१९५९ : संजय दत्त – अभिनेता
◆१९५३ : अनुप जलोटा – भजनगायक
◆१९२५ : शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार
◆१९२२ : ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर
◆१९०४ : *जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर. डी. टाटा’* – भारतरत्‍न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हें. १९९३)
◆१८८३ : बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता
●२००६ : डॉ. निर्मलकुमार फडकुले –  मराठी संत साहित्यातील विद्वान
●२००३ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता
●२००२ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार
●१९९६ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.  भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९)
●१८९१ : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)
●१७८१ : योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
●११०८ : फिलिप (पहिला) – फ्रान्सचा राजा
  

No comments:

Post a Comment