"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*30/05/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 30/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *30. मे :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
           अधिक जेष्ठ कृ. १
       तिथी : कृष्ण पक्ष प्रतिपदा,
              नक्षत्र : ज्येष्ठा,
      योग : सिद्धि, करण : बलव,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. *गाढवाला दिला मान नि त्याने केले उंच कान*- 
*★ अर्थ ::~* एखाद्या मूर्खाला मान दिला की,तो गोंधळ घालतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30.  *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
         ⭐अर्थ :: ~
   उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

       🛡 *★30. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५०वा (लीप वर्षातील १५१ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : पु. ल. देशपांडे यांना ’त्रिदल’ संस्थेच्या वतीने ’पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान
●१९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
●१९७४ : एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
●१९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
●१९३४ : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : परेश रावळ – अभिनेता
◆१९४९ : बॉब विलीस – इंग्लिश जलदगती गोलंदाज
◆१९१६ : दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार
◆१८९४ : डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८९ : दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ’मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले.
●१९५५ : नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक
●१९५० : दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ’खाम बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन
●१९१२ : विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30.  *❃❝ मिञ ओळखा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !
पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
 माणसे ओळखायला शिका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. लाचार होऊन दुकानदारांकडे प्लँस्टीकची कँरीबॅग मागण्यापेक्षा स्वतःची कापडी बॅग अभिमानाने न्या.
ही धरणीमाता सदैव आपल्या उपकारात राहील....!! 
   *॥ एक पाऊल स्वच्छतेकडे॥*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

30. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1⃣ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे  ?                                                   
➡   *नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण*     
                                                     2⃣ भारतातील पहिले वर्तमान पत्र कोणते ?                       
➡ *इंडिया गाजेट १७७६ कोलकता*
                                                          3⃣ सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?                                                                          ➡   *चादरी साठी*       
                                           
4⃣ महाराष्ट्रातील १००% साक्षर जिल्हा कोणता ?                                                     ➡    *सिंधुदुर्ग*           
                                   
5⃣ गाजरामध्ये कोणते जीवनसत्व असते  ?                                                                   ➡   *अ जीवनसत्व .*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

30. *❒ ♦कोंडाजी फर्जंद♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     शिवरायांचे मावळे कोंडाजी फर्जंद हा अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर कोंडाजी होय. तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली. यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला. राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने (जंगली रस्त्याने) अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता. फाल्गुन वद्य त्रयोदशी (दि.६ मार्च १६७३) रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून. चढून त्यांनी गडावर प्रवेश केला. मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले. किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला. ते पळून जाऊ लागले. पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला. अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 30/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment