"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 30. ऑक्टोबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक काटकसर दिन
★हा या वर्षातील ३०३ वा (लीप वर्षातील ३०४ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१३ : सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
●१९७३ : इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
●१९६६ : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
●१९४५ : भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
●१९२८ : लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

                      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६० : डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू
◆१९४९ : प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ मे २००६)
◆१९०९ : डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
◆१८८७ : सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
◆१७३५ : जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
●१९९६ : प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
●१९९० : व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
●१९९० : विनोद मेहरा – अभिनेता
●१९७४ : बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. 

No comments:

Post a Comment