"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 31. जुलै * 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २१२ वा (लीप वर्षातील २१३ वा) दिवस आहे.

                 ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
●१९९२ : सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
●१९९२ : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
●१९५६ : कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने १९ बळी घेतले.
●१९५४ : इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (मांऊंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका
◆१९४७ : मुमताज – अभिनेत्री
◆१९४१ : अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
◆१९१८ : डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित
◆१९१२ : मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
◆१९०७ : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
◆१९०२ : केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
◆१८८६ : फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते
◆१८८० : धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
◆१८७२ : लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८० : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री
●१९६८ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले.
 (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
●१८६५ : जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

No comments:

Post a Comment