"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

55. ❂ महानायिका जिजाऊ ❂

 ━━═●✶✹★●★✹✶●═━━
उज्ज्वल कर्तृत्वाने भरलेले
इतिहासाचे एक सुवर्णपान
कन्यारत्न हे इथेच  जन्मले
यादव  कुळात सामर्थ्यवान

संकटसमयी ना डगमगली
निर्भिड,न्यायी, कार्यधुरंदर
रयतेच्याच   कल्याणासाठी
आयुष्य  झिजविले  निरंतर

हिंदवी स्वराज्याची संकल्पिनी
क्रांतीकारी, युगपरिवर्तनकारी
तेजस्वी , ओजस्वी ,बुद्धिनिष्ठ
मुत्सद्दी, महत्वाकांक्षी, करारी

दैववादाला  दिला न थारा
प्रयत्नवादी  तुमचा  बाणा
प्रगल्भ  विचाराने बनविले
शिवछत्रपती,संभाजीराणा

न्याय ,स्वराज्यरक्षणासाठी
दिली स्फुर्ती , प्रेरणा शक्ती
मातृत्वाचा एकमेव आदर्श
घडविले तुम्ही दोन छत्रपती

स्वाभिमानाने  कसे जगावे
नित्य  प्रेरणा   देते अजुनी
चरित्र जिजाऊंचे आठवता
ऊर येई अभिमानाने भरुनी!

पुन्हा  एकदा घ्यावा जन्म
इथल्या  पावन  भूमीवरती
भारतभूची महानायिका
गाजत राहो जगात कीर्ती!

No comments:

Post a Comment