━━═•●◆●★◆★●◆●•═━━
मराठी नवकाव्याचे प्रणेते
🔹जन्म नाव : बाळ सीताराम मर्ढेकर
🔸जन्म :~ १ डिसेंबर १९०९
🔹मृत्यू :~२० मार्च १९५६
🔸कार्यक्षेत्र : साहित्य
🔹भाषा : मराठी
🔸साहित्य प्रकार : कविता
◆ बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर◆
मराठी नवकाव्याचे प्रणेते
🔹जन्म नाव : बाळ सीताराम मर्ढेकर
🔸जन्म :~ १ डिसेंबर १९०९
🔹मृत्यू :~२० मार्च १९५६
🔸कार्यक्षेत्र : साहित्य
🔹भाषा : मराठी
🔸साहित्य प्रकार : कविता
◆ बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा. सी. मर्ढेकर◆
हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना *मराठी नवकाव्याचे प्रवर्तक* मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्या महायुद्धा नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.
◆ पुरस्कार ◆
१९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार 'सौंदर्य आणि साहित्य'साठी.
१९९३ साली विजया राजाध्यक्ष यांना 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
मर्ढेकरांच्या कविता, त्यांच्या बद्दल केले गेलेले लेखन या सगळ्यांचा वेध घेणारे पुस्तक नागपूरच्या विजयराजे ऊर्फ डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे यांनी त्यांच्या ’मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र आणि काव्य’ या ८१५ पानी ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी विजयराजे यांनी मर्ढेकरांचा ३० वर्षे अभ्यास केला होता.
याच विषयावर समीक्षक के.रं. शिरवाडकर यांनी ‘मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
No comments:
Post a Comment