━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका गावात एक पुजारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करत असे. एकदा तो पुजारी अंधविश्वासापोटी देवाला प्रसन्न करण्यासाठी एका बक-याचा बळी देण्याचे ठरवितो. जेंव्हा बक-याला समजते कीं, आपल्याला बळी देण्यात येणार आहे. तेंव्हा एकाचवेळी बकरा अचानक हसायला तर कधी रडायला सुरुवात करतो. बक-याचे असे वागणे पाहून पुजारी संभ्रमात पडतो आणि तो बक-याला विचारतो कीं, तूं असे का करत आहेस? तेंव्हा बकरा म्हणतो , ' मागील एका जन्मी मी देखील पुजारी होतो आणि मीपण असाच हव्यासापोटी एका बक-याचा बळी दिला होता. ते पाप केल्यामुळे मला कित्येक जन्म बक-याचे रूप घेऊन पाप फेडावे लागले. आज मी पापातून मुक्त होणार आहे. त्यामुळे मी हसत आहे. आता तूं देखील मी जे केले आहे ते करणार आहेस. तुला देखील माझ्याप्रमाणे खुप सारे जन्म असेच दु:ख भोगावे लागेल. त्यामुळे दयेपोटी माझे हसणे अंश्रूमध्ये रूपांतरीत झाले. पुजा-याला त्याची चूक उमगली. तो बक-याला मुक्त करतो. तो ठरवतो कीं देवाला ध्यानधारणा करूनच प्रसन्न करून घ्यायचे .
*_🌀तात्पर्य_ ::~* प्राण्यांचा बळी दिल्याने देव प्रसन्न होत नाही.*
No comments:
Post a Comment