"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 268

    *❒ ♦चांगदेव♦ ❒* 
     ━━═•●◆●★●◆●•═━━
      चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते. चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी-पयोष्णीच्या तीरावरील चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांंना चांगदेव म्हणू लागले.एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले.* *त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली.

                ■ चांगदेवांसंबंधी पुस्तके ■
°चांगदेव (चरित्र, लेखक ज.र. आजगावकर)
°योगी चांगदेवाचा तत्त्वसार (लेख - विनायकराव कळमळकर)
°चांगदेव वटेश्वरकृत तत्त्वसाराची समाप्ति-तिथी (लेख - स.ल. कात्रे)
°शामजी गोसावी मरुद्गणकृत चांगदेव चरित्र (संपादक वि.ल. भावे
°यांशिवाय रा.चिं. ढेरे, बा.ना. मुंडी, पांडुरंगशर्मा, द.ग. काळे, गो.का. चांदोरकर आदींचे संशोधनलेख

              ■ चांगदेवांनी केलेले लेखन :~
ज्ञानदेव गाथेतील ७७ अभंग
तत्त्वसार हा ग्रंथ (४०४ ओव्या)
मुद्रित स्वरूपान न आलेली काही स्फुट पदे, अभंग आणि ओव्या, वगैरे.

No comments:

Post a Comment