"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 122

    *❃❝ कर्तव्यनिष्ठा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     फ्रान्स मधील ही गोष्ट. पॅरिस शहरात मोठी दंगल झाली.मॅथ्यू हेन्जलर नावाचा पत्रकार प्रत्यक्ष दंगलीच्या ठिकाणी जाऊन आपल्या वर्तमानपत्रासाठी बातमी तयार करीत होता.
      दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शेवटी गोळीबार करावा लागला. चुकून पत्रकाराला एक गोळी लागली. तो जखमी झाला.
  डॉक्टरांना बोलावण्यात आले. घायाळ झालेला तो पत्रकार डॉक्टरांना म्हणाला,"मी लिहू शकत नाही. भयंकर वेदना होत आहे."
   डॉक्टर त्याला  धीर देत म्हणाले, "  "अरे लिहायचे काय घेऊन बसलास? आता तुला विश्रांतीची प्रथम गरज आहे."त्यावर पत्रकार म्हणाला, "*प्रथम मला माझे कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाचे काम ठरलेले असते.  माझे काम बातमी लिहिणे आहे कृपया हा माझा कागद घ्या व त्याच्याखाली लिहा. सांयकाळी ४ वाजून वीस मिनिटांनी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तीन माणसे जखमी झाली व एक मरण पावला. डॉक्टरांनी विचारले, "मेला कोण?"  उत्तर मिळाले 'मी' आणि हे सांगता सांगताच त्या पत्रकाराने प्राण सोडला.

            *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   प्राणाची पर्वा न करता कर्तव्याची पूर्ती करणारे असे लोक हीच खरी राष्ट्राची संपत्ती होय.

No comments:

Post a Comment