"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 240

    *❃❝ मोर आणि बगळा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एका मोराने बगळ्याला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला व हा कोणी फालतु प्राणी आहे असे मनात आणून त्याला तो आपल्या रंगीत पिसा-याचे सौंदर्य दाखवू लागला. 
       त्याचा गर्व कमी व्हावा म्हणून बगळा त्याला म्हणाला,'अरे,सुंदर पिसं हे तुझ्या मोठेपणाचं लक्षण असतं तर तुमची जात श्रेष्ठ आहे हे मी कबुल केलं असतं, पण मला वाटतं जमिनीवर चालून खेळ खेळण्यात ,अन् नाचण्यापेक्षा आकाशात फिरण्याची शक्ती असणं हेच खरं मोठेपणाचं आहे!'.

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*   सगळेच गुण एकाच माणसाजवळ असतात असे नाही  म्हणून कोणी कोणास हिणवू नये.

No comments:

Post a Comment