"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 339

    *❒ ♦मोहन गोखले♦ ❒* 
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ७ नोव्हेंबर १९५३
●मृत्यु :~ २९ एप्रिल १९९९

      मराठी उत्कृष्ट सिनेअभिनेते..

     घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले. मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे. शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील 'ती येते', 'कैद' या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ' घाशीराम कोतवाल ' मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ' महापूर ' हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच 'मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं. मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ' कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ' बेबी' , 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , ' नरू आणि जान्हवी ' ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या 'बन्या -बापू' मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा  मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला. समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ' मिर्च मसाला' , सई परांजपेंचा “ स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' , मीरा नायरच्या ' मिसिसीपी मसाला' या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या. कमल हसनाच्या ' हे राम ' च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना *मोहन गोखले* यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. 

            मोहन गोखले यांची कारकीर्द
                   नाटके
    कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार ,गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी ,डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट. 

No comments:

Post a Comment