"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 179

     *❃❝ आईची शिकवण ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    शाळेत जातांना आई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाली, "बाळ तुला मी आज डब्यात दोन लाडू देत आहे एक तू खा व दुसरा तुझा गरीब मित्राला दे" ठीक आहे ! असे म्हणून आईचा निरोप घेत तो मुलगा शाळेत गेला. मधल्या सुट्टीत  त्याने मोठा व थोडा जास्त ताजा  वाटणारा लाडू आपल्या मित्राला दिला. आणि स्वतः मात्र थोडा खाल्ला. घरी आल्यावर आईने विचारले "माधव तुझ्या मित्राला तु कोणता लाडू दिला होता  छोटा की मोठा? माधव म्हणाला, "आई तूच मला एकदिवस शिकवले   होतेस की, चांगली गोष्ट नेहमी दुसऱ्याला द्यावी . त्याप्रमाणे मोठा व चांगला लाडू मित्राला दिला, छोटा  मी खाल्ला .आईला आपल्या मुलाची नकळत परीक्षा घ्यायची होती. त्याचा स्वभावाचा पहायचा होता. तिच्या परीक्षेत  तो उतरला. ती म्हणाली,  शाब्बास दुसऱ्याला जास्त देण्यास व स्वतःला कमी घेण्यात आनंद असतो. हा आनंद काही वेगळाच असतो.  आई!आज मी त्या आनंदाचा अनुभव घेतला".! मुलाच्या त्या बोलण्याने आईची मनोमन खात्री झाली की ,पुढील आयुष्यात हा कोणीतरी महान बनेल .खरोखरच त्या मुलाने मोठेपणी नाव कमावले व तो प्रख्यात न्यायाधीश व समाज सुधारक झाला.
      न्यायमूर्ती महादेव गोंविद रानडे यांच्या लहानपणीची वरील गोष्ट आहे.

    आपले आपण खाणे ही प्रकृती आहे .दुसऱ्याचे ओढुन खाणे ही विकृती आहे .तर स्वतः भुकेले  असतांनाही आपले दुसऱ्याला देणे ही संस्कृती आहे.

No comments:

Post a Comment