"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 172

      *❃❝ महानता ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांची राहणी साधी पण विचारसरणी फार उच्च होती. दिसायला लहान,पण कर्तुत्वाने व चारित्र्याने महान असा  राष्ट्र  नेता होता. ते पंतप्रधान असतानाची गोष्ट एके दिवशी आपल्या पत्नीला ललितादेवींना नासाडी आणण्याचीसाठी ते एका दुकानात गेले.त्यांना पाहून दुकानदाराने फार भारी अशा रेशमी साड्या दाखविल्या. हजार-दोन हजार त्यांच्या किमती होत्या.

     शास्त्रीजी म्हणाले, 'अरे एवढ्या महाग साड्या मला परवडणार नाहीत. दुसऱ्या साध्या व स्वस्त दाखव" तेव्हा दुकानदार म्हणाला ,"आपण पैशाची कशाला काळजी करता ?मी थोडे तुमच्याकडून पैसे घेणार आहे! आमच्यातर्फे ही आपणास भेट आहे "ते  ऐकताच शास्त्रीचे एक दोन पावले मागे सरकली जणू पुढे साप आहे आणि  त्याच्या  फण्यात लाचलुचपतीचे विष आहे, असा त्यांना भास  झाला. सात्विक संतापाने पंतप्रधान लाल होत उदगारले,  महाशय !भारताचा पंतप्रधान अशासाठी नाही झालो की, अशाप्रकारे भेटी घेत फिरू ! पुढे कधी शब्द तोंडून काढू नका अभद्र व्यवहारी करू नका. कृपया मला परवडतील अशा साड्या दाखवा".  स्वस्त साडया घेऊन व त्याचे पैसे चुकते करून शास्त्री दुकानातून बाहेर पडले.

No comments:

Post a Comment