*❃❝ बैल आणि चिलट ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
काही लोकांना आपण फार मोठे आहोत असे वाटते.पण लोक त्यांना काडीचीही किमंत देत नाहीत.
No comments:
Post a Comment