"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा~ ❝ नागरुपी भाऊ ❞

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा तीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि  ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर उंच उंच  झोके  घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत. बहीण भावाची  माया ह्या कथेतुन स्पष्ट होते.

                  *🌀❝ महत्त्व ❞ ::~*
   ‘श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळणे, म्हणजे आनंद अनुभवणे होय.
    स्त्री झोका खेळतांना तिच्या दिशेने ईश्‍वरी आनंदाचा प्रवाह आकृष्ट होते.

No comments:

Post a Comment