"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 307

  *❒ ♦मानुषी छिल्लर♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १४ मे १९९७, सोनेपत (हरियाणा, भारत),
★२०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे.
                             ◆मानुषी छिल्लर◆

      ही भारतीय मॉडेल असून २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब २५ जून २०१७ रोजी मिळवला होता. मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.

                            ■ शिक्षण ■
    मानुषीचे शिक्षण नवी दिल्लीतील सेंट थॉमस स्कूल येथे झाले. आणि सध्या ती सोनेपत येथील भगत फूलसिंग सरकारी महिला वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. राजा आणि राधा रेड्डी व कौशल्या रेड्डी या प्रसिद्ध कलाकारांकडून तिने कुचीपुडी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

                       ■ कौटुंबिक माहिती ■
   मानुषीचे वडील डॉ. मित्र बासू छिल्लर, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात, तर आई डॉ. नीलम छिल्लर या इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर ॲन्ड अलाईड सायन्सेसच्या न्यूरोकेमिस्ट्री विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत. 

No comments:

Post a Comment