"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 308

  *❒ विश्वनाथ प्रताप सिंह ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २५ जून १९३१
● मृत्यू :~ २७ नोव्हेंबर २००८

      हे भारताचे दहावे पंतप्रधान

(कार्यकाळ:~ २ डिसेंबर  १९८९ ते१० नोव्हेंबर १९९०)

                             ★विश्वनाथ प्रताप सिंग ★
   भारतीय राज्य घटनेने 340 व्या कलमानुसार ओबीसींना शिक्षणात व नोकरी मध्ये लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण दिले आहे. पण तत्कालीन पंतप्रधान श्री. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांनी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला होता. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. जर ओबीसींना आरक्षण दिले तर बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसींचे तारणहार म्हणून उदयास येतील व आपल्या पाठीशी असलेला ओबीसी बाबासाहेबांचा अनुयायी बनेल या भीतीपोटी सरदार पटेल व नेहरूंनी ओबीसींना घटनेने जे आरक्षण दिले होते त्यांच्याशी धोकाधडी केली, कालेकर नंतर मंडल आयोग स्थापन करून ओबीसींचे आरक्षण लांबविले याचा परिणाम असा झाला की ओबीसींच्या दोन पिढ्या अक्षरशः आरक्षण नसल्यामुळे व महागडय़ा शिक्षणामुळे बरबाद झाल्या.
      ओबीसींच्या आरक्षणाला पहिलेंदा जर कुणी वाचा फोडली असेल ती म्हणजे मान्यवर श्री. कांशीराम साहेबांनी एक दलित समाजाच्या व्यक्ती नेच ओबीसींना सुद्धा घटनेत आरक्षण आहे. हे जगाला ओरडून सांगितले ठिकठिकाणी सभा व बामसेफ च्या माध्यमातून ओबीसींमध्ये जनजागृती केली.(माझ्यासकट कीतीतरी म्हणजे 90% लोक हे आताही बाबासाहेबांनी फक्त एस्सी एसटी समाजासाठीच आरक्षण दिले असा समज करून घेतला आहे).
त्यांनी सर्व ओबीसी नेत्यांना म्हणजे व्ही.पी.सिंग, लालूप्रसाद यादव, शरद यादव मुलायमसिंग यादव, देविलाल ई. लोकांना सांगितले की घटनेत ओबीसींसाठी आरक्षण आहे. तेव्हा सर्व ओबीसी नेते (जनता दल) एक झाले व त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात ओबीसींसाठी असलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले.
  राजीव गांधींचा पाडाव करून पहिलेंदा देशात जनता दलाचे सरकार बीजेपीच्या पाठींब्यावर स्थापन झाले.
व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले. तेव्हा बीजेपी शिवसेनेच्या लोकांनी त्याला कडाडून विरोध केला. ओबीसींच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. हे आरक्षण एस्सी एसटी समाजासाठीच फायद्याचे आहे अशी अफवा पसरली व माझा ओबीसी बांधवच आरक्षणाचा विरोध करू लागला. ठिकठीकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात आली.
दिल्ली विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा मुद्दा संसदेत चांगलाच गाजला. त्यावर भाष्य करताना सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की जर ओबीसींना शिक्षणात व नोकरी मध्ये आरक्षण दिले तर ओपनच्या जागा कमी होतील. कमी गुणवत्तेचा मुलगा समोर गेला तर ओपनच्या मुलांच्या मानसिकतेवर परीणाम होईल आरक्षण विरोधी या लढाईत मी ओपनच्या मुलांसोबत आहे असे जाहीर करून टाकले. देश अक्षरशः पेटला होता. ज्या ओबीसींच्या जिवावर हे लोकं निवडणून येतात त्याच ओबीसींना आरक्षण द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा सर्वांनी मिळून त्याचा विरोध केला. पण व्ही.पी.सिंग या खंद्या नेत्यांने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. जश्या शिफारशी लागू केल्या बीजेपी ने आपला पाठिंबा काढून टाकला. ओबीसीच्या आरक्षणाला बीजेपीने विरोध केला असा लोकांचा समज झाला त्यातून बाहेर येण्यासाठी बीजेपी ने बाबरी मशिदचा मुद्दा उकरून, अडवाणीने देशभर रथयात्रा काढली.
    मिञांनो व्ही.पी.सिंग साहेबांनी आपल्या खुर्चीची तमा न करता मंडल आयोग लागू केला त्यामुळेच सामान्य शेतकर्याच्या मुलगा डॉ,शिक्षक होऊ शकला.

No comments:

Post a Comment