"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 284

   *❃❝ 'मी' पणा ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
       एका साधूकडे काही उद्देशाने एक गृहस्थ गेला. झोंपडी बाहेरुनच त्यांनी 'महाराज' म्हणून हाक मारली. महाराजांनी विचारल, "कोण आहे?" गृहस्थ म्हणाले, "मी". साधू "कोण"?  पुन्हा उत्तर आल 'मी' साधू म्हणाले, 'तू कोण तुला तरी माहित आहे का? तू कोण आहेस ते शोध आणि ये. त्यावर गृहस्थानी आपले नाव सांगितले'  'विजयराव.'
             
      साधूंनी त्यांना आत बोलवले आणि म्हणाले 'मी' पणा सोडावा. तो फार घात करतो. खरं म्हणजे तुम्ही विजयराव ही नव्हे.स्वतः ला विसरा आणि इतरांशी एकुरूप व्हा तरच तुमची खरी ओळख सर्वांना पटेल.

           🌀❝ तात्पर्य ❞ ::~   माणसाच्या अंगी 'मी' नसावा.

No comments:

Post a Comment