"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 261

   *❒ ♦रामकृष्ण परमहंस♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकुर ग्रामी १८३६ साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. वडील क्षुदिराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणीदेवी यांचे ते चौथे अपत्य होय. त्यांच्या जन्मापूर्वी आईवडिलांनी अनुभवलेल्या अनेक अलौकिक घटना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ गरोदर चंद्रमणीदेवींच्या गर्भाशयात एका शिवलिंगापासून निघालेल्या ज्योतीने प्रवेश केला होता. जन्मकाली गयेस तीर्थयात्रेस गेलेल्या क्षुदिराम यांना गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले, म्हणून या बालकाचे नाव गदाधर ठेवण्यात आले. रामकृष्ण लहानपणी गदा या नावाने ओळखले जात. मातीच्या मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय शिक्षणात त्यांना रुची नव्हती. तत्कालीन ब्राह्मण समाजात प्रचलित असलेल्या संस्कृत शिक्षणाचा ते “चालकला-बाँधा बिद्या” (अर्थात ब्राह्मणाची पोटभरू विद्या) असा उपहास करीत. गायन, वादन, कथेचे निरूपण आदि गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. तीर्थयात्री, संन्यासी व गावातील पुराणिकांकडून कथा ऐकून त्यांची अल्पवयातच पुराण, रामायण, महाभारत व भागवत आदी ग्रंथांशी ओळख झाली. मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत; पण संस्कृत समजत असली तरी ते बोलू शकत नसत.पुरीच्या मार्गावर असलेल्या कामारपुकुर गावात आरामासाठी थांबलेल्या संन्याशांची सेवा करून त्यांची धर्मचर्चा ते ऐकत असत.
रामकृष्णांच्या स्मृतीनुसार सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली. एकदा शेतात चालता चालता आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते बाह्यज्ञानरहित झाले, नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे.बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता – एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती
१८४३ साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोल परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या खूप जवळ आले. घरची कामे व देवपूजेत बहुतांश काळ मग्न राहू लागले.गदाधराच्या किशोरवयात कुटुंबावरील आर्थिक संकट गहिरे झाले. रामकुमार यांनी कोलकात्यात पुरोहिताचा पेशा पत्करला. १८५२ साली भावास मदत करण्यासाठी गदाधर कलकत्यास आले. 

No comments:

Post a Comment