*❃❝ अती शहाणा ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
" एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत. एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी - कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे. मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* अती शहाणा त्याचा बैल रिकामा.
No comments:
Post a Comment