"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 274

  *❒ अशफाक उल्ला खान ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  ◆ भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक ◆

●जन्म :~ २२ ऑक्टोबर १९००,
●स्मृतिदिन :~ १९ डिसेंबर १९२७

                     ★ अशफ़ाक उल्ला खान ★

      भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर सन १९२७ ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दू मध्ये तखल्लुस,(टोपण नाव) हसरत हे होते . उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत .त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये बिस्मिल आणि यांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते. 

No comments:

Post a Comment