"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 253

      *❃❝ शब्दांच्या पुढे ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
      एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी स्किन चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.

    त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.

    असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.

     त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.

     आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य अांधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,

                         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
             काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक  गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही.

No comments:

Post a Comment