*❃❝ देशभक्तीची परीक्षा ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्या मार्गानेच देश स्वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्या मुलामध्ये देशभक्ती ठासून भरलेली असल्याचे त्याच्या आईलाही जाणवले तेव्हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्या मुलाची परीक्षा घ्यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्या मनातील ही भावना त्याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्याच्या ज्योतीवर त्या मुलाला बोट धरायला सांगितले. त्या मुलाने जराही न घाबरता त्या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्याला क्रांतीकारकांची नावे सांगण्यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
असंख्य देशभक्तांनी केलेल्या त्यागामुळे,बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment