"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 165

    *❃❝ सिंह आणि उंदिर ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामूळे जागा होऊन त्याने एका उंदीरास पंजात पकडे व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली,'महाराज ,आपण मोठेपण , सर्व प्राण्यांचे का,मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हातविटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.'

     ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता एका झाडाखाली थांबले,त्याच झाडावर शिका-याने जाळे लावले होते,त त्यात तो सापडले.
     त्यावेळी  त्याने आपली सगळी शक्ती खर्चुन धडपड केला, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठ्याने ओरडू लागला.
     तो आवाज ऐकुन तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला,'राजा भिऊ नकोस स्वस्थ बस.' इतके बोलुन त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली

                       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या  हातुन एखादे वेळी होते.य यासाठी कोनाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात  मी णसाने लोकांवर  उपकार केले तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.

No comments:

Post a Comment