*❃❝ गुरुचे महत्व ❞❃*
━━═•●◆●★★●◆●•═━━
एकदा देव निवांतपणे बसले होते. तेंव्हा त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील मान्यवराचा सत्कार करावा. म्हणून त्यांनी सर्वांना बोलाऊन घेतले व सर्व क्षेत्रातील सत्कारमूर्ति निवडले. डॉक्टर, इंजीनियर, वकील, शिक्षक व राजकारणी वगैरे सत्काराला जमले. सर्व सभागृहात जमले, देव स्टेजवर खुर्चीत बसले. मग एकएकाला समोर बोलाऊन देव शाल श्रीफळ हार पदक देऊन खुर्चीतच बसून सत्कार करू लागले. पण देव खुर्चीतुन उठत नव्हते.
मग सर्वात शेवटी शिक्षकाचा नंबर आला आणी देवांनी त्यांचा उठून सत्कार केला. तेव्हा सर्वांनी देवाला प्रश्न विचारला.
आमचा बसून सत्कार झाला आणी गुरुजींचा उठून का ?हा आमच्यावर अन्याय आहे.
तेव्हा देव म्हणाले. जगात गुरुजी हे एकमेव आहेत की ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो. म्हणून त्यांचा उठून सत्कार केला.
आणी बाकी कोणावरही माझा भरोसा नाही. काय सांगावे मी उठल्यावर तुम्ही माझ्या खुर्चीवर बसायला मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून बाकीच्याचा बसून सत्कार केला.
No comments:
Post a Comment