*❃❝ स्वयंप्रकाशित व्हा.! ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही. मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."
यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे. मला अंधार आणि उजेड सारखेच. मला या कंदिलाचा काय उपयोग…? "हा कंदील तुझ्यासाठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे. या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.
मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "
त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?" हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं..
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही... म्हणून
"अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"..!!
No comments:
Post a Comment