"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महात्मा गांधी जयंती प्रभावशाली भाषणे

 

महात्मा गांधी जयंती भाषण -1

सत्य, अहिंसेचे धडे दिले जगतास..!
कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास...!!
   सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो.!
  आपण दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करतो. या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत.
गांधीजींनी त्यांचे शिक्षण ब्रिटीशशासित भारतात पूर्ण केले. यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. दक्षिण आफ्रिकेत कायद्याचा अभ्यास केल्यानंतर ते १९१५ मध्ये भारतात परतले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग बनले. उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे बळ वाढवले. त्यांनी चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी मार्च आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढताना महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबूनही ध्येय गाठता येते हे सिद्ध केले.
   महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले. जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 
आता मला माझे भाषण संपवायचे आहे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार..! धन्यवाद..!
जय हिंद! जय भारत!

~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -2
ज्यांनी लिहिली
पारतंत्र्य मुक्तीची गाथा !
त्या राष्ट्रपिताच्या चरणी
विनम्र माझा माथा !!
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.! सर्वांना माझा नमस्कार!

    आज 02 ऑक्टोबर, आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते सत्य व अहिंसेची पुजारी राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांच्या विषयी आपणास समोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
धोती वाले बापू की
ये ऐसी लढाई थी!
न गोले बरसाये उन्होंने
न बंदूक चलाई थी!!
सत्य अहिंसा के बल पर ही
दुश्मन को धुल चटाई थी !!!
महात्मा गांधी हा शब्द कानावर पडतात आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते.

  त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.
त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जावो, भारत छोडो या घोषणा दिल्या. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांना जनतेने महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या बहाल केल्या. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम.!!
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!
~~~~~~~~

महात्मा गांधी जयंती भाषण -3
   सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! आजच्या दिवशी मी तुम्हाला आपले सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो, यांच्या विषयी माझे विचार व्यक्त करणार आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी अपेक्षा…!
    अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शतशत प्रणाम.!
त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमानसात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुगावरून दिसून येते.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की 
बापू सन्मान करतो आम्ही,
तुमच्या महान नेतृत्वाचा..!
भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला,
हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा..!!
आजच्या या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

~~~~~~~~

" राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सोपे हिंदी भाषणे साठी क्लिक करा >>   

~~~~~~~~

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती  मराठी भाषण -4

  सुप्रभात, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग, शिक्षक आणि मित्रांनो. आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत, ज्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता. त्यांच्या सत्य, अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या तत्त्वांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे हा दिवस आपल्या इतिहासातील ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला.
    महिलांचे हक्क, दारिद्रय निर्मूलन, धार्मिक स्नेह, प्रामुख्याने स्वराज्य प्राप्ती यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.त्यांनी सत्य, अहिंसा ही तत्वे जगाला दिली. असहकार आंदोलन, चलेजाव  चळवळ यामुळे संपूर्ण भारत पेटून उठला. त्यामुळे इंग्रजांना आपल्या देशातून काढता पाय घ्यावा लागला.
   राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंती निमित्ताने भावपूर्ण आदरांजली.

~~~~~~~~

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती  मराठी भाषण -5
      २ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस "आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन" म्हणून  संपूर्ण जगभर साजरा केला जातो. १५ ऑक्टोबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने गांधीजींचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून घोषित करण्याचे ठरवले त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली. भारतात सर्वधर्मीय प्रार्थना, प्रभात फेऱ्या, सूतकताई करुन हा दिवस साजरा केला जातो.
    महात्मा गांधी यांचा आज जन्मदिवस आहे, ज्यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते. महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे महान नेते होते. त्यांचा सत्य आणि अहिंसेवर विश्वास होता. त्यांनी आम्हाला दयाळूपणे वागायला आणि नेहमी सत्य बोलायला शिकवले. त्यांनी अनेकांना प्रेम आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.
   चला हा दिवस आनंदाने साजरा करूया आणि महात्मा गांधींच्या महान कार्याचे स्मरण करूया! सर्वांना 'गांधी जयंती'च्या खूप खूप शुभेच्छा..! धन्यवाद..!!

~~~~~~~~

~~~~~~~~

~~~~~~~~

लालबहादूर शास्त्री जयंती भाषण -1
   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज दोन ऑक्टोबर, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर  शास्त्री यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपणास जी माहिती सांगणार आहे, ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती.
   लालबहादूर शास्त्री हे थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. उत्तर प्रदेश मधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात 02 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले.
🔴🟢🔵

    त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणामुळे शास्त्रीजी नदीच्या पाण्यात पोहून शाळेत जात असत. लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्त्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव म्हणून लालबहादूर शास्त्री हे भारतभर प्रसिद्ध झाले.
   वयाच्या अकराव्या वर्षी गांधीजींच्या भाषणाने ते भारावून गेले. मग चंपारण्य सत्याग्रह, रोलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इ. घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. तेव्हाच त्यांनी देशसेवेला वाहून घ्यायचा निश्चय केला. भारतीय स्वातंत्र्य युद्धात शास्त्रींनी ‘मरो नाही मारो’ ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला अधिक तीव्र केली.
 शास्त्री महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेते होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी 1921 मधील असहकार आंदोलन, 1930 मध्ये दांडी यात्रा व 1942 साली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सुरू केलेल्या “भारत छोडो आंदोलनात” सहभागी होऊन महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकुन दिले होते. यासाठी अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. भारत देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, रेल्वेमंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात दिवाण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महात्मा गांधी हिंदी भाषण-1

  भारत में हर साल 2 अक्टूबर को गांधी जयंती मनाई जाती है। भारत के महान स्वतंत्रता सेनानी, समाज सुधारक और राजनेता महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था। देशभर में गांधी जयंती पर राष्ट्रीय अवकाश होता है। महात्मा गांधी के त्याग और देश की आजादी में अहम योगदान के लिए उन्हें राष्ट्रपिता का दर्जा दिया गया है। देश के लोगों ने उन्हें बापू कहकर पुकारा। 


    सिर्फ देश के लिए आजादी की लड़ाई लड़ी, बल्कि समाज सुधार के कार्य भी किए। गांधी जी समाज में फैली बुराइयों जैसे छुआछूत, शराब, जातीय भेदभाव, असमानता, महिलाओं के साथ भेदभाव के भी घोर विरोधी थी। उन्होंने सिर्फ आजादी की ही लड़ाई नहीं लड़ी बल्कि समाज में दलितों की स्थिति बेहतर करने व उन्हें बराबरी का हक दिलाने के लिए भी लड़ाई लड़ी। दलित आंदोलन किया। छुआछूत के खिलाफ जबरदस्त आवाज उठाई।

   उनके अहिंसा के सिद्धांत को पूरी दुनिया ने सलाम किया, यही वजह है कि पूरा विश्व आज का दिन अंतर्राष्ट्रीय अहिंसा दिवस के तौर पर भी मनाता है।

उन्होंने कभी मांस न खाने और झूठ न बोलने का संकल्प लिया। सत्य उनका जीवन का सबसे बड़ा मौलिक गुण था। उनका जीवन सत्य और अहिंसा के नैतिक मूल्यों पर आधारित था। बापू कहते थे कि बार बार निश्चय को बदलना नहीं चाहिए, इससे मन कमजोर होता है। बापू के विचार हमेशा से न सिर्फ भारत, बल्कि पूरे विश्व का मार्गदर्शन करते आए हैं और आगे भी करते रहेंगे। आने वाले समय में वैश्विक समस्याओं से निपटने में गांधी दर्शन व उनके विचार और ज्यादा प्रासंगिक होंगे। आज के दिन हमें उनके विचारों को अपने जीवन में उतारने का प्रण लेना चाहिए।

जय हिंद..। जय भारत..। 

भारत माता की जय...||

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

Hello respected teachers, classmates and dear friends!

Today we celebrate Gandhi Jayanti, the birthday of Mahatma Gandhi.


He was born on 2nd October 1869. Gandhi Ji is known as the "Father of the Nation."


He believed in truth, non-violence, and peace.


He led India to freedom from British rule.


His famous movements include the Salt March and Quit India.


Gandhi Ji always encouraged kindness and unity.


We should follow his teachings in our daily lives.


Let us remember his great work for our country. Happy Gandhi Jayanti to all!

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••


••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••


••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••


••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••






No comments:

Post a Comment