"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 162

     *❃❝ पिंगळा व कावळा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बर्‍यावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत.

     एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला. तो आवाज ऐकून खालून चालणार्‍या माणसांनी आश्चर्याने वर पाहिले व तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहात ते चालते झाले.

                *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   नुसत्या पोशाखाने आणि हावभावांनी माणसाला पात्रता येत नाही. ती उपजतच असावी लागते.

No comments:

Post a Comment