"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा :~ ❝ अनमोल क्षण ❞

  ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी* जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.

    एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.

     'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.

     खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.

        🌀❝ तात्पर्य ❞ ::~ इतरांना जगण्यासाठी मदत करणारा क्षण खरंच अनमोल आहे*         

No comments:

Post a Comment