*❃❝ बैल आणि लाकडे ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
काही बैल एका इमारतीसाठी लाकडे रानातून लाकडे ओढुन नेत होते. बैलाचा तो कृतघ्नपना पाहून त्या लाकडाला फार राग आला.
ते बैलाला म्हणाले,'अरे, जेव्हा मी रानात उभा होतो, तेव्हा माझा पाला तूम्हाला खायला दिला. माझ्या सावलीत तूम्ही सुखाने झोप घेतली. पण हे सगळं विसरून या दगडा मातीतून तूम्ही मला ओढून नेता, तेव्हा तूमच्या या वागण्याला काय म्हणावं?'
बैलांनी उत्तर दिले,' आम्ही हे काम काही खुषीने करत नाही, आमच्या कडून ते जबरदस्तीने करून घेतलं जातं, हे जर तुझ्या लक्षात आली तर तू आम्हाला नक्कीच दोष देणार नाहीस.'
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
एखाद्याच्या इच्छेविरूद्ध त्याच्याकडून बळजबरीने जे काम करून घेतले जाते, त्याबद्दल त्याला दोष देणे योग्य नाही.
No comments:
Post a Comment