"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 273

   *❒ ♦रामचंद्र द्विवेदी♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी, गायक व आधुनिक राष्ट्रकवी

●जन्म :~ ६ फेब्रुवारी १९१५,  बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत
●मृत्यू :~ ११ डिसेंबर, १९९८, मुंबई, महाराष्ट्र, भारत

                            ★ रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप ★

     रामचंद्र द्विवेदींचा जन्म बडनगर उज्जैन येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणाऱ्या बाँबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते. कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते.

                         *☀ऐ मेरे वतन के लोगो☀*
      ऐ मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. भारत-चीन युद्धानंतर खचलेल्या भारतीयांचे मनोबल उंचावण्याचे काम या गीताने केले होते. या गीताला सी. रामचंद्र यांचे संगीत असून लता मंगेशकर यांचा आवाज आहे.
      भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

     कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.

No comments:

Post a Comment