"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

पंकज उदास

   *❒ ♦मा.पंकज उदास♦ ❒* 
  ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १७ मे १९५१ 
●मृत्यू :~ २६ फेब्रुवारी २०२४
  ★ लोकप्रिय गझल गायक मा.पंकज उदास 

     १९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून मा.पंकज उधास नावारूपाला आले. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. मा.पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं काही विसरायला लावणा-या गझल आजही रसिकांच्या गुणगुणताना दिसतात. त्यांच्या या प्रयत्नांनी भारतातील गझल क्षेत्राला व गझल गायनालाच एक नवीन उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. भारतातील गझल गायनातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. गझल गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविले आहे. मा.पंकज उधास हे १९८६ साली लीला मुळगावकर यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या ‘पीएटीयूटी’चे अध्यक्ष आहेत. संस्थेची स्थापना सेंट जॉर्ज रुग्णालय प्रादेशिक रक्तपेढीतील थॅलेसेमिया रोगापासून पीडित अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने झाली आहे.

No comments:

Post a Comment