*❃❝ गर्वहरण ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
एकदा अर्जूनाला अापल्या महालातील कोलाहलाचा खूप कंटाळा येतो. एकांतवास मिळावा म्हणून तो गजबजलेल्या नगरापासून दूर एका निर्जन जंगलात निघून जातो.
उन्हाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे वातावरणात उकाडा असतो. उकाडा दूर करण्यासाठी अर्जून एका झाडाची फांदी तोडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात एक छोटासा सूर्यपक्षी त्याच्या खांद्यावर येवून बसतो. तो चिमुकला पक्षी पक्षी अर्जूनाला विनंती करतो, " हे सर्वश्रेष्ठ धनुर्धरा ! कृपाकरून या झाडाची फांदी तोडू नकोस. या झाडावर अामची घरटी अाहेत. अाणि त्यामध्ये अामची छोटीछोटी पिलं अाहेत. तुम्ही जर फांदी तोडाल तर अामची पिलं मरतील. तेव्हा अामच्यावर दया करा. भविष्यात मी अापणास मदत करण्याचे अाश्वासन देतो."
अर्जून त्याचे म्हणने ऐकतो व तेथून निघून जातो. दुसर्या झाडाची फांदी तोडत असतांना एक मुंगी त्याच्या हातावर चढते अाणि त्याला विनंती करते ," हे कौंतेय ! या झाडाची फांदी कपाकरून तोडू नका. येथे अामची असंख्य घरे अाहेत. त्यात अनेक कुटुंब अाहेत. अापण फांदी तोडल्यास , त्या सर्वांचा नाश होईल . मी अापल्याला वचन देतो की, संकटकाळी मी अापली अवश्य मदत करेल."
अर्जून निघून जातो. पण जाताना तो विचार करतो की, "मी एवढा बलाढ्य , सर्वश्रेष्ठ धनुर्धर ! माझ्यावर कोणते संकट येणार अाहे. अाणि हे एवढाले क्षुद्र जीव माझी काय मदत करणार अाहेत?" त्याच्या मनात नकळत अहंकार घर करीत जाते .
असेच बरेच दिवस निघून जातात. पांडवाना जेव्हा अज्ञातवासाची शिक्षा भोगाण्याची वेळ येते तेव्हा अर्जून त्याच जंगलात येतो. ही गोष्ट कौरवांना माहीत होते तेव्हा ते त्याचा पाठलाग करतात. त्याच वेळी तो सूर्यपक्षी अर्जूनाला म्हणतो , " तुम्ही माझ्यामागे या."असे म्हणून तो पूढे उडू लागतो व अर्जून त्याच्य मागेमागे पळू लागतो. पक्षी एका झाडावर येवून बसतो. त्या झाडाला एक विशाल ढोली असते. अर्जून त्या ढोलीत लपून बसतो. थोड्याच वेळात झाडावरील मुंग्या त्याला झाकून टाकतात. अर्जून तसाच स्तब्ध उभा राहातो. शत्रू त्याच्या जवळ येवूनही त्याला शोधू शकत नाही.
अर्जून त्यावेळी स्वतःशी विचार करतो ," ज्या चिमुकल्या जिवांना मी क्षुद्र समजून त्यांची हेटाळनी केली होती त्याच सूर्यपक्षाने अाणि या मुंग्यांनी अाज मला फार मोठ्या संकटातून वाचविले. अन्यथा सर्वांना पून्हा वनवास भोगावा लागला असता . मी अाज यांची क्षमा मागतो. यांचे उपकार मी जन्मभर विसरू शकणार नाही. अाणि माझ्या सामर्थ्यावर कधीही गर्व करणार नाही."
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* अापण कितीही सामर्थ्यशाली असलो गुणवान असलो तरी कुणालाही कमजोर समजू नये. कोणती वेळ कशी येईल सांगता येत नाही. कुणीही , केव्हाही, कशाही रूपातअापल्या कामी पडू शकतो . प्रत्येक जीव सामर्थ्यवान असतो.
No comments:
Post a Comment