"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 292

     *❃❝ हक्काची रोटी ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एका राजाकडे एक संतपुरुष आले. प्रसंगवश गोष्ट निघाली हक्काचा रोटीची. राजाने विचारले , "महाराज , हक्काची रोटी कशी असते ? "महाराज म्हणाले, "आपल्या नगरीत अमुक ठिकाणी एक वृद्ध आजी राहतात त्या वृद्ध मातेला जाऊन विचार"

    राजा तिथे गेला व त्याने म्हटले.  "माते हक्काची रोटी पाहिजे." वृद्ध आजी म्हणाली, " राजन, माझ्याजवळ एक रोटी आहे , परंतु तिच्यातली अर्धी हक्काची आणि अर्धी बिना हक्काची." त्यावर राजाने विचारले अर्धी बिना हक्काची कशी? 

     वृद्ध आजी म्हणाली , " एक दिवस मी चरखा कातत होते. संध्याकाळची वेळ होती  अंधार पडला होता. इतक्यात तिकडून एक मिरवणूक निघाली.तिच्यात मशाली जळत होत्या. मी आपली अलग दिवा न जाळता त्या प्रकाशात अर्धी सुतगुंडी कातली. अर्धी गुंडी आधीची कातलेली होती. ती गुंडी विकली आणि पीठ आणले आणि रोटी बनवली. यासाठी अर्धी रोटी हक्काची आहे आणि अर्धी बिना हक्काची. या अर्धीवर मिरवणूक वाल्याचा हक्क आहे." राजाने हे ऐकून त्या वृद्ध  मातेपुढे मस्तक नमविले.

                     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली संपत्ती हीच तेवढी हक्काची संपत्ती जिच्यात दुसऱ्याचाही वाटा आहे, ती संपत्ती आपल्या हक्काची नाही, तेव्हाच समाजाची स्थिती सुधारेल.

No comments:

Post a Comment