"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज"


                    (६ मे १९२२ राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिन )

      सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते "राजश्री शाहू महाराज" स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन...!!

                  ६ मे स्मृतिदिन .....
        कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज हे जरी कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते तरी त्यांना १९०० साली घडलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळेपासून ब्राम्हण समाजाने नुसते जेरीस आणले होते. थोडक्यात वेदोक्त प्रकरण सांगावयाचे म्हणजे , दरवर्षी कार्तिक एकादशीला भरणाऱ्या यात्रेदिवशी कोल्हापूरला पंचगंगा नदीवर छत्रपती शाहू महाराज सकाळी आपल्या परिवारासह स्नानाला जात असत. त्यावेळी, महाराज स्नान करीत असता , महाराजांचा ब्राम्हण उपाध्याय स्वतः स्नान करून मंत्र म्हणत असे. परंतु १९०० साली सदर उपाध्याय वेळेवर आला नाही , त्याने थंडी वाजते या सबबीवर स्नान टाळले व मंत्र म्हणावयाचे ते वैदिक मंत्र न म्हणता ' पुराणातील मंत्र म्हणेन , कारण महाराज तुम्ही शुद्र असल्यामुळे तुम्हास वैदिक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही .' असे तो महाराजांनाच सांगू लागला . शेवटी त्याने वैदिक मंत्र म्हटले नाही. महाराजांनी त्याला बडतर्फ केले . व नवा उपाधाय्य नेमला पंरतु नव्या उपाध्यायावर सर्व ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातला . जलाशयावर ब्राम्हण तरुण दगडफेक करू लागले . महाराजांविरुद्ध 'केसरी' आदि ब्राम्हणी वृत्तपत्रातून बेफाम टीका सुरु झाली त्यांची ब्राम्हण वस्तीत निंदा चालविली . ते महाराज जरी होते तरी त्यांना ' स्वातंत्र्य ' नव्हते असे महाराजांना वाटे मत स्वातंत्र्य म्हणजे काय व व्यक्तीस्वातंत्र्याची जरुरी किती आहे याची अतिशय तीव्र जाणीव त्यांना झालेली होती. यावरूनच  ते नेहमी विचार करीत असत कि एक महाराज असून आपली स्थिती अशी आहे तर अस्पृश्य लोकांची व भीमरावांची स्थिती काय असेल याची कल्पना त्यांना येत होती.
छत्रपती शाहू महाराज व भीमराव हे ऐतिहासिक गरज म्हणून एकत्र आले होते. शाहू महाराज छत्रपती असून देखील भीमराव परेलला ज्या चाळीमध्ये रहात असत तेथे स्वतः मोटार घेऊन त्यांच्या भेटीला येत असत . त्यांच्या मैत्रीचे दृश्य स्वरूप मार्च १९२० मध्ये कोल्हापूर जिल्यातील माणगाव येथे जि परिषद झाली व ज्या परिषदेचे अध्यक्ष भीमराव होते व पाहुणे शाहू महारज होते, त्या परिषदेने प्रकट झाले . ह्या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिजात पुढारपणाची घोषणा केली , " हेच तुमचे खरे पुढारी आहेत; ते तुमचाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतील अशा प्रकारचे त्यांच्या अंगी गुण आहेत ." अशी घोषणा करणारे छत्रपती शाहू महाराज , भारतातील नव्हे तर जगातील एकमेव द्रष्टे पुरुष होते. एक राजा असूनही त्यांचे मन किती थोर, दयाळू व या सर्वात अधिक म्हणजे किती दिलदार होते, याची प्रचीती जगाला आल्याशिवाय राहणार नाही.

     त्यांनी १९०२ मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गाना ५० % आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकुम केला .राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्त्ये ठरले .
रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.

No comments:

Post a Comment