*❃❝ सिंहाचा जावई ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
आपल्या कूवतीबाहेरची एखाद्या गोष्टीची हाव धरली तर स्वत:चाच नाश ओढवतो.
No comments:
Post a Comment