━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एकदा एका उंदराला काहीही खायला न मिळाल्यामुळे एका बंद खोलीत एका झरोक्यातून गेला. त्याला तिथेसुध्दा खायला काहीही दिसले नाही. शेवटी एका कोपर्यात एक टोपली दिसली. उंदराला वाटले की,या टोपलीत काही तरी खायला असेल. पण ती टोपली उघडेनाच. इतक्यात तिथे एक ब्रेडचा तुकडा घेऊन दुसरा उंदीर तिथे आला. पहिला उंदीर त्याला म्हणाला, बरं झालं बुवा तू ब्रेड आणलास ते. मला खूप भूक लागलीय. आपण दोघे मिळून खाऊया. दुसरा उंदीर म्हणाला ठीक आहे. दोघांनी तो ब्रेड वाटून घेतला. पण थोड्या वेळाने पहिल्या उंदराला काही शांत बसवेना. तो म्हणाला, ही टोपली उघडत नाही. आपण दोघे मिळून कुरतडू. दुसरा उंदीर म्हणाला,मी आहे त्यात समाधानी आहे. सकाळ होताच आपण दुसरे अन्न शोधू. राहू दे त्या टोपलीला कुरतडायचे. पण पहिल्या उंदराला ते काही पटले नाही. तो टोपली कुरतडू लागला. ते पाहून दुसरा उंदीर निघून गेला. सकाळ होईपर्यंत त्या टोपलीला बरेच कुरतडले. उंदराला वाटले की,आतमध्ये भरपूर अन्न असेल. आपल्याला बरेच दिवस मिळेल. इतक्यात त्यातून एक मोठा भुकेलेला साप आला आणि त्याने उंदरालाच खाऊन टाकले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* काही काही वेळा अतिमोहापायी स्वत:चा प्राणही गमवावा लागतो.
No comments:
Post a Comment