*❃❝ लांडगा व सरस❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
" खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते.
त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की,जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.
शेवटी एक सरस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सरस त्याला म्हणाला ,तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार?
लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, मी तुझा जीव वाचविला नाही का? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो सरस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.
No comments:
Post a Comment