"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

झाशीची राणी लक्ष्मीबाई

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई

●जन्म :~ १९ नोव्हेंबर १८३५
●मृत्यू :~ १७ जून १८५८

        या एकोणिसाव्या शतकातील झाशीराज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्याब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्धझालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना *‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’* म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

        बालपण लक्ष्मीबाईंचे मूळ नावमणिकर्णिका तांबेहोते. यांचे वडीलमोरोपंत तांबेहे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचेसाताराजिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटीउत्तर प्रदेशातीलकाशीयेथे झाला होता.व्यक्तिमत्त्वधोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

     अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंतनानासाहेब पेशवे,जयाजी शिंदेव लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठीमल्लखांबनावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.....!!

                  ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment