"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 278

  *❃ खरे काय नि खोटे काय ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, आता एक बोलतील आणि नंतर वेगळेच बोलतील. यांच्‍या मनातले खरे काय आणि खोटे काय हे ब्रह्मदेवाचा बापसुद्धा सांगू शकणार नाही.''

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जिभेवर एक आणि मनात एक असणा-यां माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरे. 

No comments:

Post a Comment