*❃❝ प्रेम समर्पन ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका जंगलात एक फुलपाखरू व एक भुंगा राहत होते. ते दोघे मिळून या फुलावरून त्या फूलावर आनंदाने बागड़त असत. एक दिवस अचानक दोघेही भयानक भांडू लागले.
फुलपाखरू म्हणाले मी तुझ्या पेक्षा जास्त फुलावंर प्रेम करतो. भुंगा म्हणाला मीच फूलावंर जास्त प्रेम करतो. या विषयावरून वाद वाढत गेला संध्याकाळ झाली. वाद संपता संपत नव्हता.
तेव्हा फुलपाखरू म्हणाले की जो कोणी सकाळी लवकर उठून या समोरच्या फूलावर येऊन बसेल तो फूलावंर जास्त प्रेम करतो असे सर्वांना मान्य करावे लागेल. भुंग्याला हि युक्ती पटली दोघेही आपल्या आपल्या घरी जाऊन झोपले.
सकाळ सकाळी फुलपाखरू लवकर उठून फुलावर जाऊन बसले.
अजून भुंगा आला नव्हता, आपन जिंकलो या आनंदात फुलपाखरू वेडेपिसे झाले. ते आतुरतेने भुंग्याची वाट बघत बसले. सूर्योदय झाला पन भुंगा आला नव्हता.
सूर्याची सोनेरी किरणे पडली फुलाला जाग आली. त्याने आपल्या पाकळ्या उमलवण्यास सुरूवात केली.
फुल सम्पूर्ण उमलले तेव्हा फुलपाखराला त्यात भुंगा मरून पडलेला दिसला.
भुंगा फुलावरील प्रेम दाखविण्यासाठी रात्रीच जाऊन फूलावर बसला होता. राञी फुलाने पाकळ्या मिटून घेतल्या भुंगा त्यात अडकून पडला.
बांबूच्या लाकडाला फोडणारा भुंगा नाजूक पाकळ्या तोडू शकला नाही स्वतः जगण्यासाठी त्याने आपल्या प्रेमाचे तुकडे केले नाही. मरणाला हसत हसत मिठी मारली फुलपाखराला खुप वाईट वाटले हट्टापायी त्याने एक सुंदर मिञ गमावून बसला होता.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* जिवलग व्यक्ती वर प्रेम करा पण मनापासून करा.
No comments:
Post a Comment