"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा क्रं. 193

    *❃❝ सर्वस्व ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
   मागच्याच महिन्यातील गोष्ट आहे. रविवार होता, नेहमीची धावपळ गडबड नव्हती. निवांत टि. व्ही वर बातम्या बघत बसलो होतो. बातम्या पण त्याच त्या एकाच पठडितल्या राजकारण, खुन, हाणामारी अश्याच प्रकारच्या चालु होत्या. अचानक टि. व्हि वर एक बातमी आली आणि मन पुरत हेलावुन गेल.

   बातमी आैरंगाबादची होती. गेले ७ ते ८ दिवस एक मोकट(फिरती) गाय महानगर परीवहणच्या बसच्या पुढे येत होती. त्या बसला हलु पण देत नव्हती, सतत त्या बसच्या टायर खाली काहितरी शोधत असे. सुरवातीला बसवाल्यांनी तिला बाजुला करण्याचा खुप प्रयत्न केला पण सहजासहजी काहि ती बाजुला व्हायची नाहि. ४ ते ५ जनांनी तीला आेढुन बाजुला नेल व बसला जाऊ दिल. पण बस गेल्यावर गायीला सोडुन दिल कि ती परत पळत जाऊन त्या बसला आडवी जाई.

   बर ती गाई फक्त त्याच बसबद्दल असे करीत असे. महानगर परीवहणवाले ह्या सर्व प्रकाराने हैरान झाले. त्यांनी बसचा रंग पण बदलुन बघीतला तरीही गाई त्याच बसला आडवी जाई व त्या बसच्या पुढ्यात शोधक नजरेने काहितरी शोधत असे.

   मग महानगर परीवहणच्या एका अधिकार्याने चौकशी सुरू केली कि आसा प्रकार का होतोय? त्यावेळी त्याला अत्यंत ह्रुदयद्रावक गोष्ट कळाली. त्या गाईला एक महिन्यापुर्वीच एक वासरू झाल होत आणि ती ज्या बसला आडवी जात होती त्याच बसच्या पुढच्या टायरखाली येऊन ते चिरडल गेल. आणि म्हणुनच त्या गाईतली आई बेफामपने जीवाची पर्वा न करता त्या बसचा पाढलाग करून त्या बसच्या पुढच्या टायरपाशी आपल्या वासराला शोधत असे. तिला वेडी आशा होती कि बसच्या खालुन तीच वासरू कुठुनतरी बाहेर येईल. तीच्यासाठी ते वासरू सर्वस्व होत आणि तेच तिच्यापासुन हिराऊन घेतल होत.

                  *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  माणुस असो वा जनावर, कोणतहि  आईला तिची मुल हि तिच्यासाठी प्रणाहुनही प्रिय असतात. त्याना काहि ईजा जरी झाली की ती वेडीपिशी होऊन जाते.

No comments:

Post a Comment