"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

स्वामी विवेकानंद

 

       °स्वामी विवेकानंद° यांची जयंती यांचा  जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.

     यांच्या विचारांतून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील असे स्वामी विवेकानंद हे थोर युगपुरुष होते.


     स्वामी विवेकानंदांना कोणत्याही परिचयाची गरज नाही कारण आपण सर्व जाणतो की ते एक आध्यात्मिक गुरू आणि महान पुरुष होते ज्यांनी हिंदू धर्माच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी केल्या. 

.    विवेकानंदजींचे शब्द – “उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत भारत समृद्ध होत नाही तोपर्यंत आराम करू नका” हे आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतील आणि देशहितासाठी सतत काम करण्याची प्रेरणा देत राहतील.  आपण सर्वांनी स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे पालन करून माणुसकी जपत सर्वांसोबत एकत्र राहावे.

  ❒ ♦स्वामी विवेकानंद♦ ❒

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

    "यांच्या जयंती निमित्त

      विनम्र अभिवादन"...

      दिव्यत्वाची जेथ प्रचीती

      तेथे कर माझे जुळती ..!!

🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

★पूर्ण नाव :~ विवेकानंदन रेंद्रनाथ विश्वनाथ दत्त 

●जन्म :~ १२ जानेवारी १८६३को लकाता, पश्चिम बंगाल

●मृत्यू :~ 4 जुलै 1902 बेलूर, कोलकाता, भारत

◆वडील~ विश्वनाथ दत्त

◆आई~ भुवनेश्वरी नंदलालजी बसु

◆गुरु ~ रामकृष्ण परमहंस


     ◆ *स्वामी विवेकानंद*◆

   हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. 

      विवेकानंदांचा जन्म झाला तो दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थे पासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.


     *◆विवेकानंद नामकरण◆*

   राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना *'विवेकानंद'* असे नाव दिले.

    *●शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद●*

       सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद

११सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातिल शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

 

 *■समाधी ■*

      शुक्रवार, ४ जुलै १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्रा5जकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत आपण जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे.


No comments:

Post a Comment